भविष्य उज्वल करायचं असेल तर ‘मास्टरलाईन’ सोबत चला…. - संचालक सुयोग जैन
****************
पाथर्डी येथे ‘नूतन डिस्ट्रीब्युटरशिप’ लॉचिंगचे थाटात उद्घाटन
****************
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मास्टरलाईन इंजिन ऑईलच्या ‘नूतन डिस्ट्रीब्युटरशिप’ लॉचिंगचा उद्घाटन समारंभ ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अतिथी मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला. मुख्य अतिथी म्हणून मास्टरलाईन लुब्रीकंट प्रा. लि. चे डायरेक्टर सुयोग जैन, चॅनल सेल्सचे नॅशनल हेड रितेश सिंह राठौर, पाथर्डी येथील श्री साई स्पेअर हाऊसचे सर्वेसर्वा तथा मास्टरलाईनचे नूतन डिस्ट्रिब्युटर शुभम दहीफळे (बी. एसी मायक्रोबायोलॉजी), त्यांचे वडील दिलीपराव दहीफळे (केंद्रप्रमुख जि. प. शिक्षण विभाग, नगर) यांची उपस्थिती होती.
भविष्य उज्वल करायचं असेल तर मास्टरलाईन सोबत चला - सुयोग जैन
उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कंपनीचे डायरेक्टर सुयोग जैन म्हणाले कि, मास्टरलाईन इंजिन ऑईल कंपनी ही उच्च दर्जाचे ऑईल निर्मिती करणारी कंपनी असून वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट म्हणून मान्यता पावली आहे. जागतिक बाजारपेठेवर मास्टरलाईनने आपला ठसा उमटाविला आहे. विविध देशामध्ये मास्टरलाईन ऑईल पोहचले आहे. कंपनीतील टेस्टींग लॅब मध्ये ऑईल प्रॉडक्ट प्रमाणित करूनच ते बाहेर जाण्यास परवानगी मिळत असते. जागतिक बाजारपेठेत खरे उतरलेल्या मास्टरलाईनची डिस्ट्रीब्युटरशिप आम्ही पाथर्डीत दिल्याचा अत्यानंद आम्हाला आहे. श्री साई स्पेअर हाऊसचे सर्वेसर्वा तथा मास्टरलाईनचे नूतन डिस्ट्रिब्युटर शुभम दहीफळे यांच्यामार्फत आमचे विविध ऑईल प्रॉडक्ट आपल्यापर्यंत पोहचतीलच. आपल्या सर्वांना ‘आत्मनिर्भर’ बनायचे असेल तर एकमेकांना सोबत घेऊन पुढचा प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी आपण प्रथम आमच्याशी जुडा, आम्ही विश्वास देतो, तुम्हाला शेवटपर्यंत मास्टरलाईन साथ देईल. आता तुमच्या शहरातच कंपनीने तुमच्यातीलच एक चांगला माणूस दिला आहे. तरूण उद्योजक शुभम दहीफळे हे उच्च शिक्षित असून ते नक्कीच तुम्हाला उज्वल भविष्याच्या वाटेवर घेऊन जातील, असे सुयोग जैन यांनी सांगितले. यावेळी मॅकेनिकल बांधव (फिटर) व विविध ऑईल, ऑटो पार्टस विक्रेते उपस्थित होते. दरम्यान, सुयोग जैन यांनी विविध ऑईल उत्पादनांची माहिती देऊन त्यांच्या क्रियेबाबत उपस्थितांशी हितगुज केले. मॅकेनिकल रॉयल्टी प्रॉग्रामसह विविध योजनांची माहिती दिली.
उद्घाटनास भरगच्च उपस्थिती
पाथर्डी येथील अतिथी मंगल कार्यालयात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास पाथर्डी शहर व तिसगांवचे ऑईल विक्रेते, ऑटो पार्ट्सचे मालक, मॅकेनिकल बांधव (फिटर), गॅरेज मालकांची लक्षणीय उपस्थिती होती. यात ऋषिकेश दहीफळे, संदीप दुधाळ, महाराज फिटर, ऋषिकेश तुपे, अंकूश दानवे, संदीप पालवे, गणेश जायभाये, अर्जून शिरसाठ, बापू हाडके, पुंडलिक गर्जे, संतोष चितळे, पप्पू शिंदे, अन्सार शेख, अमोल हाडके, सिद्दीकी मणियार, आलम शेख, नवनाथ म्हस्के, रोहीदास दहीफळे, जुबेर शेख, जगद हारे, मनोज वलके, जगदीश भागवत, राहुल आव्हाड, बाबा सोलत, शेखर गर्जे, राहुल बरूदे, जमीरभाई, गणेश खेडकर, संदीप थोरात, महादेव बडेकर, प्रकाश शिंदे, अशोक मरकड आदींची उपस्थिती लाभली. सुमारे १५० जणांनी सहभाग नोंदविला.
पिता - पुत्राचा संचालकांतर्फे सन्मान
मास्टरलाईनची डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेले पाथर्डी येथील शुभम दहीफळे तसेच त्यांचे वडील दिलीपराव दहीफळे यांचा राजस्थानी पगडी घालून, शाल आणि सर्टीफिकेट देत कंपनीचे संचालक सुयोग जैन व कंपनीचे सेल्स प्रमुख रितेशसिंह राठौर यांनी सन्मान केला. यावेळी, सौ. इंदूमती दिलीपराव दहिफळे, शिवम दिलीपराव दहिफळे, सौ. नम्रता शुभम दहिफळे, रूद्रांश शुभम दहिफळे यांचीही उपस्थिती होती.
फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन
कार्यक्रमस्थळी मास्टरलाईनचे विविध प्रॉडक्ट ठेवण्यात आलेले होते. प्रॉडक्टची दिलीपराव दहीफळे यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रसंगी सुयोग जैन, रितेश सिंह राठौर, शुभम दहीफळे, शिवम दहीफळे व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
आमचे ऑईल दर्जेदार - रितेश सिंह राठौर
मास्टरलाईन बेस्ट ऑईल देतेच, त्यासोबत सेवा आणि स्किम सुध्दा देते. मुंबई लॅबने जागतिक दर्जाची गुणवत्ता असलेले प्रॉडक्ट म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. आमचीही स्वतंत्र टेस्टींग लॅब आहे. कमी पैशात दर्जदार ऑईल देण्यात मास्टरलाईन अग्रेसर आहे. त्यासाठी आपण दर्जेदार क्वॉलिटी निवडा, असे आवाहन करीत त्यांनी कंपनीत बनविल्या जात असलेल्या ऑईलची माहिती दिली. तसेच विविध ग्रेड व त्याची कार्यप्रणाली समजावून सांगितली.
गिफ्ट वाटप अन् ऑईलची ऑर्डर -* कार्यक्रमस्थळी आलेल्या सर्व विविध विविध ऑईल विक्रेते, ऑटो पार्टस मालक, वॉशिंग सेंटर मालक, गॅरेज मालक व मॅकेनिकल बांधवांना गिफ्ट देण्यात आले. लॉचिंग ऑफर स्किम अंतर्गत २५ जणांनी मास्टरलाईनच्या ऑईलची ऑर्डर बुक केली आहे. सुत्रसंचालन शिलज पांडे यांनी केले. आभार सुयोग जैन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषिकेश दहीफळे, शाहरूख पटेल, आकाश हलकुदे, समाधान म्हस्के, स्वप्नील सरदार आदींनी परिश्रम घेतले.